Pimpri Crime : बांधकाम सेंन्ट्रींगच्या भाड्याने घेतलेल्या प्लेटची परस्पर विक्री करुन 9 लाखाची फसवणूक

एमपीसी न्यूज –  बांधकाम सेंन्ट्रींगच्या (Pimpri Crime) भाड्याने घेतलेल्या लोखंडी प्लेटची परस्पर विक्री करुन 8 लाख 90 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना 4 फेब्रुवारी ते 3 जून 2022 दरम्यान अजमेरा कॉलनी पिंपरी येथे घडली.

प्रदीप ज्ञानेश्वर शितकर (वय 40, रा. अजमेरा कॉलनी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोशन चके (पूर्ण नाव, पत्ता समजू शकला नाही), सतिश रंगनाथ मुळे (रा. मांजरवाडी, पुणे), प्रफुल्ल दत्तात्रय मुळे (रा. पूर्णानगर, जुने आरटीओ, चिंचवड) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Pimpri News: हप्ता दिला नाही म्हणून चाकू दाखवत अल्पवयीन मुलांकडून धमकी

फिर्यादी यांचा सिंहगड रोड येथे बांधकाम व्यवसाय आहे. फिर्यादी यांच्या गोडावूनच्या ऑफीसमध्ये आरोपी आले. आरोपी सतिश, प्रफुल्ल यांनी आम्ही चुलता, पुतणे आणि रोशन हा कामगार आहे. बांधकाम व्यवसायासाठी सेंट्रींगच्या लोखंडी प्लेटची आवश्यकता आहे असे सांगून फिर्यादीकडून 445 सेंन्ट्रीगच्या (3 बाय 2 लांबी-रुंदी) असलेल्या लोखंडी प्लेट भाडे तत्वावर घेतल्या. या प्लेट परस्पर दुसऱ्या व्यक्तीस विक्री करुन फिर्यादीची 8 लाख 90 हजार रुपयांची फसवणूक (Pimpri Crime) केल्याचे पोलिसांनी सांगितले. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.