Pimpri Crime : बीआरटी रोडमध्ये दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-निगडी मार्गावरील बीआरटी रोडमध्ये दुचाकी घसरून पडली. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 5) रात्री नऊ वाजताच्या सुमारास पिंपरी येथे घडली.

आशिष अविनाश दुर्गावळे (वय 19) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

_MPC_DIR_MPU_II

मिळालेल्या माहितीनुसार, आशिष त्याच्या दुचाकीवरून गुरुवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास पिंपरीकडून निगडीच्या दिशेने बीआरटी मार्गातून जात होता. पिंपरी येथे अहिल्याबाई होळकर चौकाजवळ आल्यानंतर त्याची दुचाकी घसरली.

दुचाकी घसरून आशिष रस्त्यावर पडला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.