Pimpri : तरुणीचा विनयभंग करून ऍसिड टाकण्याची धमकी देणाऱ्या तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज – तरुणीशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग करत घडलेल्या प्रकाराबाबत घरच्यांना सांगितल्यास चेहऱ्यावर ऍसिड फेकण्याची धमकी देणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 18) दुपारी पावणे पाचच्या सुमारास पिंपरी येथे घडली.

आकाश विष्णू साळवी (वय 22, रा. पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी 19 वर्षीय तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी आरोपी आकाश पीडित तरुणीच्या दुचाकी समोर आला. त्यानंतर आकाश याने तरुणीला थांबवून तिच्या दुचाकीची चावी काढून घेत हाताने मारहाण केली. तसेच तरुणीशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. घडलेला प्रकार घरच्यांना सांगू नये म्हणून आरोपीने तरुणीच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकण्याची धमकी दिली.

पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.