Pimpri : सार्वजनिक ठिकाणी भांडणाऱ्या आठ जणांवर गुन्हा

TakaTak Gang

एमपीसी न्यूज : – सार्वजनिक ठिकाणी भांडण करणाऱ्या (Pimpri) आठ जणांवर पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी (दि. 24) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास नेहरूनगर पिंपरी येथे घडली.

संकेत संतोष उबाळे (वय 20), किरण योगेश वाघ (वय 22), सचिन संजय तहसीलदार (वय 30), राहुल संजय तहसीलदार (वय 25) आणि चार महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार पंडित धुळगंडे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Wakad : तरुणावर खुनी हल्ला करून पळालेल्या तामिळनाडूमधील सराईतांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संपत्तीच्या कारणावरून आरोपी एकमेकांसोबत सार्वजनिक रस्त्यावर भांडण करीत होते. आरोपींनी मोठमोठ्याने आरडाओरडा, शिवीगाळ करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share