Pimpri : तरुणीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्या रोडरोमियोवर गुन्हा

एमपीसी न्यूज – महाविद्यालयीन (Pimpri) तरुणीचा पाठलाग करुन तिला त्रास देणाऱ्या रोडरोमियोवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हा प्रकार नोव्हेंबर 2022 पासून सुरु होता.

याप्रकऱणी पिडीत तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आकर्ष अजितकुमार मदनवार (वय 20, रा.मोशी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tathawade : आई व मुलीशी गैरवर्तन करणाऱ्या आरोपीला बेड्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या फोनवर फोन करुन किंवा पाठलाग करुन आरोपी हा सतत त्रास देत होते. फिर्यादीच्या पालकांनी समजावून सांगितल्या (Pimpri) नंतरही त्याने त्याचे वागणे कायम ठेऊन फिर्यादी यांना धमकी दिली की माझे एकले नाही तर तुला व तुझ्या कुटुंबीयांना जिवंत सोडणार नाही. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.