Pimpri : अभियंत्यास मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना पदाधिका-यावर गुन्हा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अभियंत्यास मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांच्यासह दोघांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सोमवारी (दि. 11) पिंपरी महापालिकेत घडली.

अनिल महादेव राऊत (वय 52, रा. आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल कलाटे (वय 35, रा. वाकड), विनोद मोरे (वय 28, रा. पिंपरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक कल्याण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास विनोद मोरे यांनी फिर्यादी राऊत यांना फोन केला. नगरसेवक राहुल कलाटे यांच्या टीडीआर फाईलवर सही का केली नाही म्हणून त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर कलाटे यांनीही फोनवरून राऊत यांना शिवीगाळ केली. त्यानंतर महापालिका भवनातील कार्यकारी अभियंता सतीश इंगळे यांच्या कार्यालयात राऊत यांना कलाटे यांनी खुर्ची फेकून मारली. तसेच राऊत यांची गचंडी पकडल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

राहुल कलाटे म्हणाले की, ”आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मला आणि माझ्या पक्षाला बदनाम करण्यासाठी भाजपने रचलेले हे षडयंत्र आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.