Pimpri : दारुची साठवणूक करत विक्री करणाऱ्या दोन महिलांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – बेकायदेशीर रित्या विक्रीसाठी दारूची साठवणूक (Pimpri) करणाऱ्या दोन महिलांवर पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पिंपरीतील भाटनगर परिसरात गुरुवारी (दि.28) सकाळी करण्यात आली.
याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई रोहीत वाघमारे यांनी फिर्याद दिली असून दोन महिलां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Chinchwad : मूर्तीदान उपक्रमात 11 हजारपेक्षा अधिक मूर्त्यांचे संकलन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्राय डे असल्याने महिला या त्यांच्याजवळील देशी व विदेशी अशा स्वरुपाची दारू बेकायदेशीर रित्या विकत होत्या.
पोलिसांना याची खबर मिळताच पोलिसांनी छापा टाकून 23 हजार (Pimpri) 110 रुपयांची देशी व विदेशी दारु जप्त केली.याचा पुढील तपास पिंपरी पोलीस करत आहेत.