Pimpri : महिलेकडे खंडणी मागणाऱ्या विरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – महिलेला फोन करुन पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या विरोधात पिंपरी (Pimpri) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना मंगळवारी (दि.21) पिंपरीतील बौद्ध नगर येथे घडली.
Akurdi News: भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव या क्रांतिकारकांना गुरुद्वारात अभिवादन
याप्रकऱणी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.22) तक्रार दिली असून किल्या उर्फ किरण कापसे याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मोबाईल क्रमांकावर आरोपीने फोन करून जीवे मारण्याची धमकी देते पाच लाख रुपयांचीखंडणी मागितली आहे.
आरोपीला अद्याप अटक केली नसून पिंपरी पोलीस पुढील तपास करत आहेत.