BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: माजी नगरसेवकासह कार्यकर्त्यांवर गुन्हा; वाढदिवसात फटाके फोडून शांतताभंग

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून एका माजी नगरसेवकाने भर रस्त्यात फटाके वाजवले. याप्रकरणी शनिवारी (दि.२३) माजी नगरसेवकासह इतर १५ कार्यकर्त्यांवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पोलीस नाईक पी.ए. करे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार धनराज बिरदा (रा.प्रथम सोसायटी, वाकड) यांच्यासह इतर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. बिरदा हे माजी नगरसेवक तसेच भाजपचे प्रदेश संगठन महामंत्री आहेत.

पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी पिंपरी चिंचवड शहराच्या हद्दीत जमावबंदीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, बिरदा यांच्या वाढदिवसानिमीत्त शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास अनेक कार्यकर्ते एकत्र जमले. सोसायटीसमोरील रस्त्यावर फटाके फोडून वाढदिवस साजरा केला.

याबाबत माहिती मिळाली असता वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकणी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक महेश स्वामी याचा अधिक तपास करीत आहेत.

.

HB_POST_END_FTR-A1
.