Pimpri Crime : पिंपरीत दोन एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – पिंपरी मधील मेन बाजारपेठेत असलेल्या दोन एटीएम सेंटरमध्ये मशीनची तोडफोड करून चोरी करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सोमवारी (दि.16) सकाळी नऊ वाजता उघडकीस आला.

दिनेश धोंडीराम शिर्के (वय 28, रा. दिघी) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी मेन बाजारपेठेत दुर्गामाता मंदिराजवळ आयसीआयसीआय बँकेचे एटीएम सेंटर आहे. रविवारी (दि. 15) सकाळी सहा ते सोमवारी (दि. 16) सकाळी नऊ वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी एटीएम सेंटरमध्ये उघड्या दरवाजा वाटे प्रवेश केला. एटीएमचा डिस्प्ले, की पॅड आणि शटर बॉक्स तोडला. त्यानंतर एटीएम सेंटर मधील सीसीटीव्ही कॅमेरे तोडून नुकसान केले. चोरट्यांनी एटीएममध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे.

कॅनरा बँक पिंपरी शाखा येथील एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही कॅमेरे तोडले आहेत. या दोन्ही एटीएम मध्ये चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.