23.2 C
Pune
शुक्रवार, ऑगस्ट 12, 2022

Pimpri Crime : खोटे बोलण्यास नकार दिल्याने भर रस्त्यात 19 वर्षीय मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज – खोटे बोलण्यास (Pimpri Crime) नकार दिल्याने 19 वर्षीय मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

बजरंग वाघीरे (रा. पिंपरी गाव) व काळेवाडीमध्ये राहणाऱ्या दोन महिला या आरोपी आहेत. त्यांच्या विरोधात भा. द. वि. कलम 307, 120 (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जखमी झालेल्या मुलीचे नाव सिमरन आहे. सदर दोन आरोपी महिलांपैकी एका आरोपी महिला साक्षी ही 10-12 दिवसापूर्वी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. दुसऱ्या आरोपी महिलेने सिमरन हिला साक्षी तुझ्या घरी आली होती असे सांगण्यास बजावले. परंतु, सिमरन हिने खोटं बोलण्यास नकार दिल्याने सदर दोन आरोपी महिलांनी बजरंग वाघीरे यास सिमरन हिला भर चौकात जीवे मारण्यास सांगितले. त्यांच्या सांगण्यावरून वाघीरे याने सिमरन हिस चाकूने (Pimpri Crime) भोकसले. ज्यात सिमरन हि गंभीर जखमी झाली आहे.

Bavdhan Rape Case : बलात्कार प्रकरणी एकाला अटक

spot_img
Latest news
Related news