Pimpri Crime : पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार करत बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – दोन दिवसांपूर्वी झालेल्या किरकोळ शाब्दिक बाचाबाचीच्या कारणावरून सात जणांनी मिळून एकाला कोत्याने वार करत बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 9) सायंकाळी पावणे सात वाजता यशवंतनगर, पिंपरी येथे चहाच्या टपरीवर घडली.

अशोक रोहिदास वाघमारे (वय 25, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गुड्या उर्फ रोहित शिंदे (वय 24), छोटा व्हिलन उर्फ सागर क्षीरसागर (वय 23), नागेश जोगदंड (वय 22), अनिकेत कांबळे (वय 23), सागर गायकवाड (वय 22, सर्व रा. विठ्ठलनगर, पिंपरी), अन्य दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी पावणे सात वाजता यशवंतनगर, पिंपरी येथील एका चहाच्या टपरीवर फिर्यादी अशोक वाघमारे आणि त्यांचे मित्र राम शिवाजी वाघमारे, नचिकेत सुग्रीव गायकवाड यांच्यासोबत चहा पित बसले होते. त्यावेळी आरोपी गुड्या तिथे आला. गुड्या आणि अशोक यांच्यामध्ये दोन दिवसांपूर्वी किरकोळ शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यावरून गुड्याने अशोकवर कोयत्याने वार केले.

छोटा व्हिलन आणि अन्य साथीदारांनी फावड्याच्या दांडक्याने, बांबूने मारहाण केली. अशोक यांचा मित्र राम वाघमारे, वडील आणि भाऊ भांडणे सोडविण्यासाठी आले असता आरोपींनी त्यांनाही मारहाण करून जखमी केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.