Pimpri Crime: दोन टोळक्यांमध्ये हाणामारी पोलिसात परस्परविरोधी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : पिंपरी येथे दोन टोळक्यांमध्ये किरोकोळ कारणावरून मारामारी झाली. यात काहीजण जखमी झाले असून या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pimpri Crime) ही घटना सोमवारी (दि.1) रात्री दहा वाजता पिंपरी येथे घडली.

 

ऋषीकेश सचिन जमदाडे (वय 19 रा. पिंपरी) याने पिंपरी पोलीस ठाण्यात पहिली फिर्याद दिली असून सिद्धार्थ वाघमारे (रा.पिंपरी), आशिष पाल (रा.पिंपरी), रितेश किर्ते व त्यांचे चार साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तर रितेश याने दिलेल्या फिर्यादित ऋषिकेश जमदाडे, अविनाश प्रकाश माने, अक्षय केशव आम्ले व त्यांचे तीन साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्याचा मित्र अक्षय केशव आम्ले, अविनाश माने हे रितेशच्या घरी गेले. तेथे त्यांनी रितेशच्या आईला त्याला समजावून सांगण्यास सांगितले.(Pimpri Crime) यावरून रितेश याने चिडून फिर्यादी हा त्याच्या मित्रासोबत बसला असताना तेथे आला. त्याच्यासोबत त्याचे साथीदारही होते. त्यांनी फिर्यादिला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी कोयत्याच्या उलट्या बाजूने फिर्यादीच्या पाठीत डोक्यात मारले. डोक्यातून रक्त आल्यानंतर त्यांनी मारणे थांबवले फिर्यादीला जिवे मारण्याची धमकी दिली.

Metro DP road: मेट्रोने डीपी रस्ताच केला गायब!

तर रितेश याने दिलेल्या फिर्यादीत जुन्या भांडणाचा राग मनात धरून ऋशिकेष याने रितेशला कोयत्याच्या मुठीने मारहाण केली,तसेच फिर्यादीचा मित्राच्या गाडीची तोडफोड केली. (Pimpri News) यामध्ये फिर्यादी व त्याचे मित्र जखमी झाले आहेत.पिंपरी पोलीसांनी दोन्ही तक्रारी दाखल केल्या असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.