Pimpri Crime : मारहाण प्रकरणी परस्पर विरोधात गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून दोन गटात मारहाण झाली. त्याबाबत दोन्ही गटांनी परस्पर विरोधात फिर्याद दिली आहे. ही घटना सोमवारी (दि. 23) रात्री जशन कॉर्नर, डेअरी फार्म रोड, पिंपरी येथे घडली.

मोहिंदर नारायणदास मंगतानी (वय 62, रा. शिवानंद सोसायटी, पिंपरी गाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पीटर फिलिप, पीटर फिलिप याची पत्नी आणि मुलगी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगतानी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगतानी यांची पुतणी त्यांच्या इमारतीच्या खाली फोनवर बोलत थांबली होती. त्यावेळी आरोपी पीटर याने मोपेड दुचाकी मंगतानी यांच्या अंगावर घातली. त्यावेळी त्यांची पुतणी ओरडली. ओरडण्याचा आवाज ऐकून मंगतानी यांचे भाऊ तिथे आले. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या भावाला मारहाण केली. फिर्यादी यांच्या हाताला दुखापत झाली आहे.

याच्या परस्पर विरोधात ओटो पीटर फिलिप (वय 58, रा. जशन कॉर्नर बिल्डिंग, डेअरी फार्म रोड, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार हेमा किशन मंगतानी, किशन मंगतानी, मोहिंदर मंगतानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिलिप यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी आणि त्यांची पत्नी दुचाकीवरून जात होते. ते त्यांच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये दुचाकी पार्क करत असताना आरोपी तिथे आले. त्यांनी खोटा आरडाओरडा करून फिर्यादी यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पार्किंगमध्ये पडलेला सिमेंटचा गट्टू फिर्यादी यांना मारला. फिर्यादी यांची मुलगी आणि पत्नी भांडण सोडविण्यासाठी आल्या असता मोहिंदर याने त्यांनाही शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.