Pimpri crime : गुटखा साठवणूक प्रकरणी एकास अटक

 

एमपीसी न्यूज – शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवल्या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला.(Pimpri crime) त्यातील एकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 19) दुपारी तपोवन मंदिर रोड, पिंपरी येथे करण्यात आली.

 

मदनलाल पुखराज माळी (वय 50, रा. पिंपरीगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार जावेद भाई (वय 50, रा. बोरगाव, कर्नाटक) याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक विष्णू भारती यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Chikhali News : जीवे मारण्याची धमकी देत नातेवाईकाकडून तरुणीवर लैंगिक अत्याचार 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मदनलाल याने शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी त्याच्या घरात साठवून ठेवला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरात छापा मारून कारवाई केली.(Pimpri crime) त्यात पोलिसांनी ५६ हजार ६५१ रुपयांचा गुटखा जप्त केला. मदनलाल याला हा गुटखा जावेद भाई याने पुरवला असल्याने त्याच्याही विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.