गुरूवार, ऑक्टोबर 6, 2022

Pimpri Crime : आत्महत्येच्या पैजेसाठी त्याने थेट पोलिसांच्या गाडीसमोर घेतली उडी

एमपीसी न्यूज – आत्महत्येची पैज लावत (Pimpri Crime) एका माथेफिरूने थेट पोलिसांच्या गाडी समोरच उडी घेतल्याची घटना रविवारी (दि.14) सांयकाळी पावणे पाचच्या सुमारास सोमाटणे येथे परंदवाडी ते सोमटणेकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर घडली. पोलिसांनी तीनही माथेफिरूंना अटक केली असून, अजय भगवान पंडागळे (वय 40 रा. देहुरोड), सचिन चंद्रकांत माने (वय 24, रा. पिंपरी) व योगेश शिवाजी कांबळे (वय 27, रा. पिंपरी) अशी त्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरगाव परंदवाडी येथील पोलीस कर्मचारी योगेश जालिंदर नागरगोजे हे त्यांची चारचाकी गाडी घेऊन सोमाटणे फाट्याकडे जात होते. यावळी उड्डाणपुलावर आधीच हजर असलेले आरोपीपैक एक अचानक गाडी समोर आडवा पडला. नागरगोजे यांनी वेळीच ब्रेक दाबल्याने अनर्थ टळला. यावेळी नागरगोजे यांनी गाडी खाली उतरून तीनही आरोपींना हटकले व असे करण्यास मनाई केली.

यावेळी आरोपींना पोलिसांचे ओळखपत्रही दाखवले. मात्र, याला न जुमानता त्यांनी तू पोलीस असला म्हणून काय झाले. आमची आत्महत्येची पैज लागली आहे. तू जा इथून आमचे आम्ही बघून घेऊ म्हणत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांना अडवले असता आरोपींनी ऩागरगोजे यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी इतर पोलीस कर्मचाऱ्यांना बोलवत आरोपींना बेड्या ठोकल्या. तिघांवरही आत्महत्येचा प्रयत्न करणे व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला असून शिरगाव परंदवाडी पोलीस याचा पुढील तपास (Pimpri Crime) करीत आहेत.

Nasa Fraud : नासामधील मौल्यवान धातूचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घालणाऱ्या निलंबीत पोलीस अधिकाऱ्याला अटक

spot_img
Latest news
Related news