Pimpri Crime : पती-पत्नीला चाकूने मारहाण

एमपीसी न्यूज – विनाकारण शिवीगाळ करणा-या व्यक्तीला जाब विचारल्यावरून पती-पत्नीला चाकूने मारहाण केल्याचा प्रकार शुक्रवारी (दि. 9) रात्री अकरा वाजता विठ्ठलनगर, नेहरूनगर, पिंपरी येथे घडला आहे. मारहाण करणा-यास पोलिसांनी अटक केली आहे.

दशरथ गंगू वाघमारे (वय 54, रा. विठ्ठलनगर, नेहरूनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आनंद राजू संतोषी (वय 38, रा. विठ्ठलनगर, नेहरूनगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास फिर्यादी आनंद हे त्यांचे शेजारी सचिन म्हस्के यांच्याशी बोलत थांबले होते. त्यावेळी आरोपी शेजारी दारू पिऊन घराबाहेर आला. त्याने विनाकारण आनंद यांना शिवीगाळ केली. ‘मला का शिव्या देतो’ असा जाब आनंद यांनी दशरथ याला विचारला असता दशरथ याने घरातून चाकू आणून आनंद यांना जखमी केले.

त्यांची भांडणे सोडविण्यासाठी आनंद यांच्या पत्नी आल्या असता दशरथ याने त्यांनाही छातीवर मारून जखमी केले. पोलिसांनी दशरथ याला अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.