Pimpri Crime : महिन्याला दोन हजार रुपये हप्ता द्यायचा नाहीतर ठार मारीन; भावालाच धमकी

एमपीसी न्यूज –  भाजी मंडईतील भावाच्या फळांच्या दुकानासमोर हातात (Pimpri Crime) कोयता घेऊन उभा राहून ‘दर महिन्याला दोन हजार रूपये हप्ता द्यायचा, नाहीतर ठार मारीन’ अशी धमकी मोठ्या भावाने दिली. ही घटना शुक्रवारी (10 जून) पिंपरी भाजी मंडई येथे घडली.
याबाबत सकलेन युसुफ शेख (वय 25, रा. नढेनगर काळेवाडी) याने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्याचा मोठा भाऊ तन्वीर युसुफ शेख (वय 33 रा. काळेवाडी) याच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी (Pimpri Crime) सकलेन यांचा मोठा भाऊ आरोपी तन्वीर याने हातात कोयता घेऊन फिर्यादीस ‘दर महिन्याला दोन हजार रूपये हप्ता द्यायचा नाही, तर ठार मारणार’ असल्याची धमकी दिली. त्यानंतर घरी जाऊन फिर्यादीच्या पत्नीस ‘तुझ्या नवर्‍याला बाहेर यायला सांग नाही तर, तुला व तुझ्या मुलास जाळून मारेन’ अशी धमकी दिली. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.