Pimpri Crime News : पुलावरून ढकलून देण्याची धमकी देत तरुणाला लुटले

एमपीसी न्यूज – पायी जाणाऱ्या तरुणाला पुलावरून ढकलून देईन ( Pimpri Crime News) अशी धमकी देत दोघांनी लुटले आहे. हा धक्कादायक प्रकार ही घटना मंगळवारी (दि. 7) मध्यरात्री जुना पुणे-मुंबई महामार्ग, पिंपरी येथे घडला.

प्रवीण मनोज शिरसाठ (वय 23, रा. रांजणगाव एमआयडीसी, पुणे) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Pune Crime News : धक्कादायक… विवाहित महिलेच्या मासिक पाळीतील रक्त सासरच्या मंडळींनी विकल्याचा घृणास्पद प्रकार समोर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एका कंपनीत काम करतात. ते मंगळवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास कंपनीच्या बस मधून जुना पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरी येथे उतरले. तिथून ते बीआरटी रोड ओलांडून जात असताना विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीवरील दोघांनी फिर्यादी यांना अडवले. आम्हाला पैसे दे नाहीतर तुला मारीन.

तुला पुलावरून फेकून देईन, अशी धमकी दिली. फिर्यादी यांनी आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितले असता चोरट्यांनी फिर्यादीच्या खिशात जबरदस्तीने जात घालून 21 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन ( Pimpri Crime News) आणि पाच हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. फिर्यादीला एका फोन पे नंबरवर 1 हजार 400 रुपये पाठवण्यास सांगितले. रोख रक्कम, मोबाईल फोन, ऑनलाईन पैसे आणि स्मार्ट वॉच घेऊन चोरटे पळून गेले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.