Pimpri Crime News: पिंपरी कॅम्पमध्ये 59 हजारांची घरफोडी

एमपीसी न्यूज – पिंपरी कॅम्प परिसरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून 59 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 1) दुपारी 12 ते 1 वाजताच्या सुमारास वैष्णोदेवी मंदिराच्या पाठीमागे, पिंपरी कॅम्प येथे घडली.

गित दिनेश धर्मदासानी (वय 28, रा. वैष्णोदेवी मंदिराच्या पाठीमागे, पिंपरी कॅम्प) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धर्मदासानी यांचे घर मंगळवारी दुपारी बारा ते एक वाजताच्या सुमारास कुलूप लाऊन बंद होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातून 59 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. मंगळवारी रात्री उशिरा याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.