Pimpri Crime News : मोबाईलवर अश्लील बोलून व पाठलाग करून विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – महिलेला मोबाईलवरून अश्‍लील बोलून तिचा पाठलाग करून विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी एका अनोळखी व्यक्‍तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपरी येथे घडली.

राहुल (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने सोमवारी (दि. 26) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 मार्च 2019 पासून आरोपी राहुल हा फिर्यादी महिलेचा लपून छपून पाठलाग करीत होता. फिर्यादी महिलेला तिच्या फोनवर करून तिने कोणते कपडे घातले आहेत, सध्या ती कोठे आहे, याची अचूक माहिती दिली. तसेच तिच्याशी अश्‍लील बोलून तिचा विनयभंग केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.