Pimpri Crime News : अवैध दारूसाठा व विक्री प्रकरणी दोन ठिकाणी कारवाई, तीन जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – अवैध दारू साठा व विक्री प्रकरणी पोलिसांनी दोन ठिकाणी कारवाई केली. चाकण आणि हिंजवडी परिसरात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिली कारवाई चाकण येथील आबासाहेब व्हेज नॉनव्हेज फॅमिली रेस्टॉरन्टवर करण्यात आली. सामाजिक सुरक्षा पथकाने शुक्रवारी (दि.24) ही कारवाई केली.

याप्रकरणी हॉटेलचे मालक सतिश उत्तम डिसले (रा. सानेचौक, चिखली) तसेच मॅनेजर आप्पा बबन खोडवे (वय 44, रा. खेड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हॉटेलमध्ये अवैध देशी, विदेशी दारूची विक्री करत असल्याचे आढळून आले.

सामाजिक सुरक्षा पथकाने याठिकाणी छापा टाकून 7 हजार 360 रूपये किंमतीची दारू, 28 हजार 670 रोख रक्कम व 5 हजार रूपयांचा मोबाईल जप्त केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार बांगर करत आहेत.

दुसरी कारवाई माण (ता. मुळशी) येथे करण्यात आली. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्याचे पालीस शिपाई श्रीकांत अशोक चव्हाण यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानुसार बिरू माधव भुरे (वय 22, रा. माण, ता मुळशी, मुळगाव निलंगा, लातूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने 1840 रूपयांची दारू विक्री करण्यासाठी विनापरवाना जवळ बाळगली होती. पोलिसांनी दारू जप्त करत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अधिक हिंजवडी पोलीस ठाण्याचे तपास पोलीस हवालदार टकले करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.