Pimpri Crime News : दोन पान टपऱ्यांवर कारवाई; 8 हजार 600 रुपयांचा गुटखा जप्त

0

एमपीसी न्यूज – पिंपरी पोलिसांनी दोन पान टपऱ्यांवर कारवाई केली. त्यात पोलिसांनी 8 हजार 685 रुपयांचा आरएमडी, विमल पण मसाला गुटखा आणि तंबाखू जप्त केली आहे. 

पहिल्या कारवाईमध्ये विशाल बिदीचंद प्रसाद (वय 36, रा. पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची पिंपरी मधील आंबेडकर चौकात रॉक्सी हॉटेलच्या जवळ प्रीतम पान टपरी आहे. त्यात त्याने प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी ठेवला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत टपरीमधून दोन हजार 920 रुपयांचा आरएमडी, विमल पान मसाला गुटखा जप्त केला.

दुसऱ्या कारवाईमध्ये मोहम्मद हनीफ अब्दुल कादर शेख (वय 30, रा. पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची देखील पिंपरी मधील आंबेडकर चौकात रॉक्सी हॉटेलजवळ रॉक्सी पान टपरी आहे. त्यात त्याने प्रतिबंधित गुटखा साठवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने त्यावर देखील पोलिसांनी कारवाई करत 5 हजार 765 रुपयांचा विमल पान मसाला, आरएमडी गुटखा, तंबाखू बंद पाकीट जप्त करण्यात आले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.