Pimpri Crime News : सोलापूर जनता सहकारी बँक फोडण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – सोलापूर जनता सहकारी बॅंकेच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश करून बँकेत चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 11) पहाटे उघडकीस आली.

विजय वंसत जोशी (वय 50, रा. सिंहगड रोड, पुणे) यांनी शनिवारी (दि. 11) याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जोशी हे पिंपरी रेल्वे स्टेशन जवळील सोलापूर जनता बॅंकेत शाखा व्यवस्थापक म्हणून काम करतात. शनिवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास चोरट्यांनी बॅंकेचे मेन गेट कटावणीच्या साहाय्याने तोडले. त्यानंतर शटरची दोन्ही कुलूप तोडून बॅंकेत प्रवेश करीत चोरीचा प्रयत्न केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.