Pimpri Crime News : पोलिसात तक्रार दिली म्हणून अंगावर कार घालून ठार मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – व्याजाच्या पैशांवरून झालेल्या भांडणाची फिर्याद पोलिसात दिली. त्यावरून पोलिसात तक्रार देणा-याच्या अंगावर कार घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी (दि. 8) पहाटे सहा वाजता पिंपरी गावातील नव महाराष्ट्र शाळेजवळ घडली.

तानाजी एकनाथ थोरात (वय 54, रा. नवमहाराष्ट्र शाळेच्या मागे, पिंपरी गाव) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी रविवारी (दि. 11) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सतेश एकनाथ नाणेकर (रा. शिवाजी पुतळ्याजवळ, पिंपरी गाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सतेश याने फिर्यादी थोरात यांना 30 हजार रुपये व्याजाने दिले आहेत. त्या व्याजाच्या पैशांच्या कारणावरून आरोपी सतेश याने फिर्यादी नानेकर यांना मारहाण व शिवीगाळ केली होती. तसेच फिर्यादी यांच्या पत्नीला देखील अश्लील बोलला होता. याबाबत थोरात यांनी पिंपरी पोलिसात गुन्हा नोंदवला होता.

पोलिसात गुन्हा नोंदवल्याचा आरोपी सतेशच्या मनात राग होता. 8 ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजताच्या सुमारास फिर्यादी कामावर जाण्यासाठी नवमहाराष्ट्र शाळेसमोरील बस थांब्यावर कंपनीच्या बसची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी सतेश याने त्याच्या कारने (एम एच 14 / एच सी 2820) थोरात यांना ठार मारण्याच्या उद्देशाने धडक दिली. यामध्ये थोरात यांच्या मांडीचे हाड मोडले. याबाबत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.