Pimpri Crime News : घरफोडी करून लाईट फिटिंगचे साहित्य व रोख रक्कम चोरीला

एमपीसी न्यूज – रिव्हर रोड पिंपरी येथे एका घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून लाईट फिटिंगचे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण 18 हजार 900 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 7) सकाळी उघडकीस आली.

नागेन्द्रकुमार बाबूलाल यादव (वय 38, रा. रिव्हररोड, आंबेडकर नगर, पिंपरी) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यादव यांचे घर रविवारी रात्री आठ ते सोमवारी सकाळी सहा वाजताच्या कालावधीत कुलूप लावून बंद होते. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातून लाईट फिटिंगचे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण 18 हजार 900 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.