Pimpri Crime News : भीमनगर येथे भर दुपारी घरफोडी; सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास

एमपीसी न्यूज – पिंपरीमधील भीमनगर येथे युगांतर मित्र मंडळ चौकात घरफोडी झाली. या घरफोडीमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना 30 एप्रिल रोजी दुपारी उघडकीस आली.

चांदण दिलीप थोरात (वय 36, रा. युगांतर मित्र मंडळ चौक, भीमनगर, पिंपरी) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी थोरात यांचे घर 29 एप्रिल रोजी दुपारी दोन ते 30 एप्रिल रोजी दुपारी पाच वाजताच्या कालावधी कुलूप लावून बंद होते. दरम्यानच्या कालावधीत चोरट्यांनी घराच्या दरवाजातील खालची फळी तोडून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाट उघडून त्यातून सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम असा एकूण 27 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.