Pimpri Crime News : दांपत्यास मारहाण करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – एका दांपत्यास मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची ही घटना 17 जुलै रोजी रात्री अकरा वाजता गांधीनगर पिंपरी येथील महिंद्रा ॲथिया सोसायटीसमोर घडली.

रोहन खरात (वय 21), कृष्णा गोवर्धन लोकरे (वय 23, दोघे रा. गांधीनगर, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत नौशाद जब्बार सय्यद (वय 38, रा. गांधीनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे 17 जुलै रोजी रात्री अकरा वाजता घराच्या बाहेर थांबले असताना आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. त्याबद्दल फिर्यादी यांनी आरोपींना जाब विचारला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना धमकी दिली.

तसेच त्यांच्या पत्नीला प्लास्टिक बॅरिकेटने मारले. फिर्यादी यांना सिमेंटच्या गट्टूने मारत असताना त्यांनी तो चुकवल्याने तो सिमेंटचा गट्टू त्यांच्या लहान मुलाला लागला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्या दुचाकीची तोडफोड करून नुकसान केले.

पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.