Pimpri Crime News : तरुणीचा पाठलाग करून अश्लील हावभाव करत विनयभंग

एमपीसी न्यूज – एक महिन्यापासून तरुणीचा पाठलाग करून तिला शिवीगाळ करत तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव करत विनयभंग केला. हा प्रकार पिंपरी येथे घडला असून याबाबत रविवारी (दि. 4) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्ताफ शेख (वय 35, रा. पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 29 वर्षीय तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील एक महिन्यापासून आरोपी अल्ताफ हा फिर्यादी तरुणीचा दुचाकीवरून पाठलाग करत होता. तरुणीकडे पाहून शिवीगाळ व धमकी देत होता. रविवारी सायंकाळी त्याने फिर्यादी तरुणीकडे पाहून अश्लील हावभाव करत तरुणीचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.