Pimpri crime News : पिस्तूल जमा न करणाऱ्या माजी नगरसेवकाच्या पत्नीवर गुन्हा

0

एमपीसी न्यूज – पतीच्या निधनानंतर त्यांच्याकडील परवानाधारक पिस्तूल जिल्हाधिकारी कार्यालय किंवा पोलिस ठाण्यात जमा न करणाऱ्या माजी नगरसेवकाच्या पत्नीवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चारू नरसिंहा शिंदे (वय 52, रा. शिंदे बंगला, दापोडी) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. फौजदार पुजा कदम यांनी भोसरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

नरसिंहा शिंदे हे पिंपरी – चिंचवड नगरपालिका असताना मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यानंतर स्वेच्छा निवृत्ती घेऊन शिंदे हे पिंपरी – चिंचवड महापालिकेत नगरसेवक म्हणूनही निवडून आले होते. त्यांचे 2014 मध्ये निधन झाले. नरसिंहा शिंदे यांच्याकडे परवानाधारक पिस्तूल होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरसिंहा शिंदे यांचे निधन झाल्यानंतर पत्नी चारू यांनी पतीचे परवानाधारक पिस्तूल पोलीस ठाण्यात अथवा जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करणे बंधनकारक होते.

मात्र, चारू शिंदे यांनी 1 पिस्तूल आणि 25 जिवंत काडतुसे असा 30 हजार रूपयांचा मुद्देमाल स्वतःकडे ठेवला. त्यानुसार त्यांच्यावर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III