Pimpri crime News : न्यायालयातील केस मागे घेण्यासाठी महिलेची सोशल मीडियावर बदनामी

एमपीसी न्यूज – न्यायालयात सुरू असलेली केस मागे घेण्यासाठी दोघांनी मिळून महिलेची सोशल मीडियावर बदनामी केली. याबाबत पीडित महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी मिलिंद शामराव बोरकर (वय 38, रा. अंधेरी, मुंबई) आणि 8287741132 या मोबाईल फोनधारकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी यांची न्यायालयात केस सुरू आहे. ती केस मागे घेण्यासाठी आरोपींनी महिलेचे वैयक्तिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून तिचा विनयभंग केला. त्यामुळे पीडितेने पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली.

पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.