Pimpri crime News : तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – विनाकारण तरुणाला शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 5 ऑक्टोबर रोजी रात्री साडेबारा वाजता रिव्हर रोड, बौद्धनगर पिंपरी येथे घडली.

निखील चरण तामचीकर (वय 22, रा. भाटनगर, पिंपरी) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विपुल उर्फ भैय्या कांबळे (वय 24), अमित सूर्यवंशी (वय 21, दोघे रा. बौद्धनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तामचीकर 5 ऑक्टोबर रोजी रात्री साडेबारा वाजता बौद्धनगर येथे सिगारेट पित बसले होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. त्यांनी तामचीकर यांना शिवीगाळ करून इथून निघून जाण्यास सांगितले.

त्यानंतर आरोपींनी तामचीकर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. गाडीच्या लोखंडी चावीने डोळ्यावर, कपाळावर, कानावर आणि हातावर मारून जखमी केले.

पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.