Pimpri Crime News : ‘ॲमेझॉन’च्या गोदामातून कामगाराने पळवले पावणे चार लाखांचे साहित्य

एमपीसी न्यूज – ॲमेझॉन कंपनीच्या गोदामामध्ये काम करणा-या एका कामगाराने गोदामातून तीन लाख 76 हजार 157 रुपयांचे साहित्य चोरून नेले. ही घटना ऑक्टोबर 2020 ते जानेवारी 2021 या कालावधीत टेल्को रोड, पिंपरी येथील सोर्टेशन सेंटर येथे घडली.

सोमेश्वर दत्ता खरात (वय 22, रा. शिवाजी चौक, ओटास्कीम, निगडी) असे गुन्हा दाखल झालेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत दत्तात्रय एकनाथ पवार (वय 29, रा. नवी मुंबई) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेल्को रोड, पिंपरी येथे एमआयडीसीचे सेंट्रल वेअर हाऊस आहे. त्यात ॲमेझॉन कंपनीचे गोदाम आहे.

आरोपी सोमेश्वर त्या गोदामात काम करत होता. त्याने ऑक्टोबर 2020 ते जानेवारी 2021या कालावधीत गोदामातून तीन लाख 76 हजार 157 रुपये किमतीचे लॅपटॉप, कॉम्प्युटर व इतर साहित्य चोरून नेले.

एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.