Pimpri crime News : ‘एफडीए’च्या कारवाईत सव्वा दोन लाखांचा गुटखा जप्त

दोघेजण ताब्यात

एमपीसी न्यूज – अन्न व औषध सुरक्षा प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला याचा साठा व वाहतूक प्रकरणी पिंपरीत दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली. या दोन्ही कारवायांमध्ये सव्वा दोन लाखांचा गुटखा व पण मसाला जप्त करण्यात आला. डिलक्स चौक आणि रिव्हर रोड याठिकाणी शुक्रवारी (दि.12)  ही कारवाई करण्यात आली.

पहिली कारवाई डिलक्स चौक याठिकाणी करण्यात आली. या कारवाईत राजू टिंगुमल माखिजा (वय 36, रा. प्रेमप्रकाश मंदिराजवळ, पिंपरी) याला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी दुचाकीवरून (एमएच 14/ ईके 6756) 11 हजार 970 किंमतीचा पानमसाला व गुटखा वाहतूक करून नेताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

दुसरी कारवाई रिव्हर रोड, लक्ष्मी धर्मशाळेजवळ करण्यात आली. येथून 2 लाख 18 हजार 935 रूपयांचा पान मसाला, गुटखा, आरएमडी असे तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. याप्रकरणी लालचंद अर्जुनदास रामनानी (वय 58, रा. रिव्हर रोड, लक्ष्मी धर्मशाळेजवळ, पिंपरी) या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

दोन्ही कारवाई प्रकरणी खेमा लक्ष्ण सोनकांबळे (वय 43, अन्न सुरक्षा अधिकारी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक केंगार करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.