Pimpri Crime News : कामाला निघालेल्या पत्नीवर चाकूने वार

एमपीसी न्यूज – कामाला निघालेल्या पत्नीला रस्त्यात गाठून तिच्यावर चाकूने वार केले. यामध्ये पत्नीच्या गळ्याला आणि बोटाला गंभीर दुखापत झाली. ही घटना बुधवारी (दि. 9) सकाळी अकरा वाजता पिंपरी येथील जिजामाता हॉस्पिटलच्या गेटसमोर रस्त्यावर घडली.

मानसी ललित तलरेजा (वय 25, रा. काळेवाडी, मूळ रा. पिंपरी) असे जखमी महिलेचे नाव आहे. त्यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ललित ईश्वर तलरेजा (वय 40, रा. पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे पती-पत्नी आहेत. त्यांच्यात घरगुती कारणांवरून मागील काही दिवसांपासून भांडण सुरु आहार. फिर्यादी या पिंपरी येथील एका दुकानात काम करतात. बुधवारी सकाळी त्या कामावर जात होत्या.

पिंपरीमधील जिजामाता रुग्णालयाच्या समोर आल्यानंतर आरोपी पतीने फिर्यादी यांना रस्त्यात गाठले. त्याने फिर्यादी यांच्या गळयावर आणि हाताच्या बोटावर भाजी कापण्याच्या चाकूने वार केले. यामध्ये फिर्यादी जखमी झाल्या.

पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.