Pimpri Crime News : ‘रेमडेसिवीर’ काळ्या बाजारात विकताना ‘स्पर्श’च्या कर्मचाऱ्यांसह तिघांना अटक

एमपीसी न्यूज – रेमडेसिवीर काळ्या बाजारात विकताना ‘स्पर्श’च्या कर्मचाऱ्यांसह तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तीन मोबाईल फोन, दोन इंजेक्शन असा 30 हजार 389 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. डिलक्स चौक ते काळेवाडीकडे जाणा-या रोडवर डेंटल प्लॅनेट हॉस्पिटल समोर (शुक्रवारी, दि.07) हा प्रकार उघडकीस आला.

नितीन हरिदास गुंड (वय 23, रा. विजयनगर, काळेवाडी), सागर काकासाहेब वाघमारे (वय 24, रा.विजयनगर, काळेवाडी) व स्पर्श हॉस्पिटलच्या वतीने ऑटोक्लस्टर येथे ब्रदर म्हणून काम करणाऱ्या अजय बाबाराज दराडे (वय 19, रा. मैत्री चौक, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन व्यक्ती काळ्याबाजारात रेमडेसीवीर विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बनावट ग्राहकामार्फत नितीन गुंड याच्याशी संपर्क साधून इंजेक्शनबाबत विचारणा केली. त्यावेळी दोन इंजेक्शन मिळतील असे सांगितले. तसेच प्रत्येकी 40 हजार प्रमाणे दोन इंजेक्शनसाठी 80 हजारांची मागणी केली. इंजेक्शन घेण्याची तयारी दाखविल्यानंतर आरोपींनी काळेवाडी येथील डेंटल प्लॅनेट हॉस्पिटलसमोर येण्यास सांगितले.

यावेळी पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पथक आणि अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने संयुक्त कारवाई करत वरील तीनही आरोपींना व त्यांच्याकडील रेमडेसिवीरची दोन इंजेक्शन ताब्यात घेण्यात आली. यानंतर आरोपींकडे चौकशी केली असता ऑटो क्लस्टर येथे ब्रदर म्हणून काम करणाऱ्या अजय बाबाराज दराडे याच्याकडून इंजेक्शन घेतल्याची कबुली आरोपींनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.