Pimpri Crime News : शहरातील तीन चोरीच्या घटनेत सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज  – पिंपरी मधून दुचाकी चोरीला गेली. तर तळेगाव परिसरात दोन घरफोडीच्या घटना उघडकीस (Pimpri Crime News) आल्या. याप्रकरणी शुक्रवारी (दि. 27) अज्ञाताच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.

वैभव ज्ञानेश्वर कल्याणकर (वय 25, रा. देहूगाव) यांनी दुचाकी चोरीबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कल्याणकर यांची 25 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 14/ एडब्ल्यू 8232) काळभोर नगर येथून 24 जानेवारी रोजी सायंकाळी सहा ते रात्री साडेआठ वाजताच्या कालावधीत चोरीला गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Crime News : दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये पिस्टल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक

घरफोडीच्या पहिल्या प्रकरणात प्रशांत शामराव साळवे (वय 30, रा. नाणोली, ता. मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. साळवे यांच्या घराच्या किचनच्या दरवाजातून घरात प्रवेश करून चोरट्यांनी एक लाख 87 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 26) रात्री दहा ते शुक्रवारी (दि. 27) मध्यरात्री एक वाजताच्या कालावधीत घडली.

घरफोडीच्या दुसऱ्या प्रकरणात रोहन वाल्मिक बालगुडे (वय 29, रा. सोमाटणे  फाटा, मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना गुरुवारी (दि.26) सकाळी अकरा ते शुक्रवारी (दि.27) सकाळी दहा वाजताच्या कालावधीत घडली.सोमाटणे फाटा येथील अशिफ हरियानावाला यांच्या बंद असलेल्या बंगल्यातून एसी, बाथरूम नळ, गिझर, स्टेपलायझर, कागदपत्रे असा 14 हजारांचा ऐवज (Pimpri Crime News) चोरून नेला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.