Pimpri Crime News : सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांना अटक

एमपीसी न्यूज – पिंपरीतील उद्योगपती व माजी उपमहापौर अमर मूलचंदानी यांना अटक करण्यात आली आहे. दि सेवा विकास को-ऑप बँकेतील कथित घोटाळा प्रकरणी पोलिसांनी रविवारी (दि. 07) रात्री त्यांना ताब्यात घेतले.

_MPC_DIR_MPU_II

पिंपरी बाजार पेठेतील व्यापाऱ्यांची बँक म्हणून सेवा विकास बँक प्रसिद्ध आहे. या बँकेचे अमर मूलचंदानी अध्यक्ष होते. त्यांनी 2010 ते 2019 पर्यंत 238 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या गुन्ह्याप्रकरणी मूलचंदानी यांना रविवारी रात्री आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश म्हणाले, 420 आणि इतर अतिरिक्त कलमाअंतर्गत मूलचंदानी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पण, उच्च रक्तदाब आणि मधुमेह यामुळे त्यांना तात्पुरता स्वरुपात एमसीआरमध्ये ठेवण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.