Pimpri Crime News : पतीची पेन्शन मिळवण्याच्या नादात गमावले पावणे दोन लाख

एमपीसी न्यूज – पतीची पेन्शन न आल्याने ऑनलाईन माध्यमातून हेल्पलाईन नंबर घेऊन त्यावर महिलेने फोन केला. फोनवरील व्यक्तीने महिलेच्या डेबिट कार्डची गोपनीय माहिती घेऊन त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांच्या खात्यातून सुमारे पावणे दोन लाख  रुपये ट्रान्सफर करून घेत (Pimpri News) फसवणूक केली. ही घटना 8 ते 12 जानेवारी या कालावधीत उद्यमनगर पिंपरी येथे घडली.

Shrirang Hospital : श्रीरंग चिकित्सालया मुळे आता चऱ्होली येथेही आयुर्वेदिक उपचार शक्य

याप्रकरणी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे पती सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांची मागील महिन्याची पेन्शन आली नसल्याने महिलेने ऑनलाईन माध्यमात एलआयसी पीजीएस युनिट असे सर्च केले. तिथे त्यांना एक हेल्पलाईन क्रमांक मिळाला. महिलेने त्यावर फोन करून आपली तक्रार सांगितली. मात्र फोनवरील व्यक्ती ही ठग असल्याचे महिलेच्या प्रथम लक्षात आले नाही. फोनवरील व्यक्तीने महिलेला मदत करण्याच्या बहाण्याने त्यांच्या डेबिट कार्डची गोपनीय माहिती घेतली. त्याआधारे महिलेच्या खात्यातून 1 लाख 71 हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेत फसवणूक केली. बँक खात्यातून पैसे कमी (Pimpri News)झाल्यानंतर महिलेच्या हा प्रकार  लक्षात आला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.