Pimpri crime News : घरफोडी करून 70 हजारांचे मोबाईल पळवले

एमपीसी न्यूज – उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी घरातून 70 हजार रुपये किमतीचे सहा मोबईल फोन चोरून नेले. ही घटना 6 सप्टेंबर रोजी पहाटे पाच ते दहा या कालावधीत विशाल थिएटर समोर पिंपरी येथे घडली.

सागर गणेश कदम (वय 28, रा. विशाल थिएटर समोर, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल थिएटर समोरील राजप्लास्टी बिल्डींगमध्ये फिर्यादी कदम यांचा कामगार दाऊद सिकंदर आत्तार हा राहतो. 6 सप्टेंबर रोजी तो त्याच्या पत्नीला आणण्यासाठी बारामती येथे गेला होता. घराबाहेर जाताना त्याने दरवाजा पुढे केला आणि निघून गेला.

त्यावेळी घरातील टेबलवर ठेवलेले 70 हजार रुपये किमतीची सहा मोबईल फोन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले.

पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.