Pimpri Crime News : घरात घुसून आई आणि मुलाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून तीन जणांनी घरात घुसून आई आणि मुलाला बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 3) दुपारी निराधार नगर, पिंपरी येथे घडली.

संगीता नामदेव माले (वय 40, रा. निराधार नगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रोहित नाशे (वय 27), गणेश भुंगा कांबळे (वय 22), कुमार सुखदेव वीर (वय 25, सर्व रा. निराधार नगर, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास फिर्यादी संगीता आणि त्यांचा मुलगा त्यांच्या घरात जेवण करत होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपींनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी यांचा मुलगा आकाश यास शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. फिर्यादी संगीता ती भांडणे सोडवण्यासाठी गेल्या. त्यावेळी आरोपी रोहित नाशे याने सिमेंटचा गट्टू फिर्यादी यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. आरोपी रोहित नाशे याला पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.