Pimpri Crime News : मायलेकीचा विनयभंग; पीडित महिलेच्या पतीलाही मारहाण

एमपीसी न्यूज – औषधांच्या दुकानातून घरी चाललेल्या मायलेकीचा विनयभंग करण्यात आला. त्यांच्या मदतीला आलेल्या पतीलाही मारहाण करण्यात आली. ही घटना पिंपरी येथे गुरुवारी (दि. 13) रात्री घडली.

सचिन सुरेश ओंबासे (वय 26) आणि अमर सुरेश ओंबासे (वय 20, दोघेही रा. भारत नगर, पिंपरी) अशी गुन्हे दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पिडित महिलेने गुरुवारी (दि. 13) याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांची मुलगी मेडिकलमधून औषध घेऊन घरी चालल्या होत्या. त्यावेळी आरोपींनी त्यांना रस्त्यात अडवून विनाकारण शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी आणि त्यांच्या 15 वर्षीय मुलीचे अंगावरील कपडे फाडून विनयभंग केला.

फिर्यादी यांच्या मदतीला आलेल्या त्यांच्या पतीलाही आरोपींनी लोखंडी रॉड व बांबूने मारहाण करून जखमी केले. आरोपी सचिन याच्यावर यापूर्वी 2014 मध्ये पिंपरी पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल आहे.तर आरोपी अमर याच्यावर 2016 मध्ये वाकड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे.

पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.