Pimpri crime News : विवाहितेच्या छळप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – विवाहितेच्या छळ प्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना संत तुकाराम नगर, पिंपरी येथे घडली.

पती विक्रम सिद्धार्थ पवार, सासू लता पवार, दीर विशाल पवार, चुलत सासरा रमेश अण्णा पवार, चुलत सासू सुजाता पवार, चुलत नणंद धनश्री पवार, चुलत नणंद श्‍वेता पवार, नवऱ्याचा आतेभाऊ समीर सूर्यगंध, आतेभावाची पत्नी आरती सूर्यगंध अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीची नावे आहेत.

याबाबत पीडित विवाहितेने सोमवारी (दि. 26) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 23 नोव्हेंबर 2008 ते 26 ऑक्‍टोबर 2020 या कालावधीत पिंपरीतील संत तुकाराम नगर, येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती विक्रम पवार याने फिर्यादी विवाहितेला वेळोवेळी मारहाण केली. तसेच सासू, चुलत सासू आणि दोन चुलत नणंद यांनी फिर्यादी यांच्या संमतीशिवाय त्यांच्या घरात घुसून त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच घरातील साहित्याची नासधूस केली.

चुलत नणंद धनश्री आणि आतेभाऊ समीर यांनी फिर्यादी यांना अंगावरील कपड्यानिशी घराबाहेर काढले. घराला कुलूप लावून फिर्यादी विवाहितेला घरात जाण्यास प्रतिबंध केला. आरोपी समीर आणि त्याच्या बायकोने इतर आरोपींना चिथावणी दिली.

पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.