Pimpri crime News: महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज – महिलेसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. याबाबत महिलेच्या पतीने जाब विचारला असता विनयभंग करणा-या व्यक्तीने पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार रविवारी (दि. 25) दुपारी पाच वाजता गांधीनगर, पिंपरी येथे घडला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

बबन अजिनाथ ओव्हल (वय 52, रा. गांधीनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने रविवारी (दि. 25) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला पतीसोबत घरी जात असताना आरोपी बबन गाडीवरून आला. त्याने पीडित महिलेकडे एकटक बघत तिचा विनयभंग केला.

याबाबत पतीने बबन याला विचारणा केली असता बबन याने पतीला शिवीगाळ करून ‘मी तुला मारून टाकीन’ अशी धमकी दिली. त्यानंतर बबन निघून गेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.