Pimpri Crime News : ‘तुझ्याशी लग्न झाल्यापासून पणवती मागे लागली’

विवाहितेचा छळ करणाऱ्या पती, दीर, नणंद यांच्या विरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – ‘लग्नापूर्वी माझं एका महिलेशी अफेअर होते, आजही आहे. पण, बॅडलक तू माझ्या गळ्यात पडली, तुझ्याशी लग्न झाल्यापासून पणवती मागे लागली’ असे म्हणून पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी पती, दीर, नणंद असे पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

21 ऑगस्ट 2011 ते 2 जुलै 2021 दरम्यान मासुळकर कॉलनी पिंपरी याठिकाणी हा प्रकार घडला.

याप्रकरणी पीडित विवाहितेने शुक्रवारी (दि.2) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ॲगनोला ॲन्थुनी सॅम्युयल (वय 50), डॉनबॉक्सो ॲन्थुनी सॅम्युयल (वय 45), डॉर्ती फिलीप फ्रँक (वय 58, शांतीनगर, वानवडी), सुनिता मॅक्सी लोबो (वय 54, रा. वडगांव शेरी, पुणे) व लोरिन आरुख्यनादन ॲन्थुनी (वय 52, रा. खडकी, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा पती दारु पिऊन फिर्यादी यांना मारहाण करायचा. तसेच माझं एका महिलेशी अफेअर होते, आजही आहे. पण, बॅडलक तू माझ्या गळ्यात पडली, तुझ्याशी लग्न झाल्यापासून पनोती मागे लागली’ असे म्हणून पती पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ केला. मारण्याची धमकी देऊन फिर्यादी यांच्या आईकडून पैसे घ्यायचा. नंदा घरी आल्यावर भांडण लावायच्या असं फिर्यादीत म्हटले आहे.

अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गिरी करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.