Pimpri : जबरी चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज- कर्जाच्या प्रकरणाबाबत बॅंकेत चला असे सांगितल्याने तीन जणांनी एकाशी झटापट करून त्याच्या गळ्यातील एक लाख 33 हजार रुपयांची सोन्याची चेन हिसकावून नेली. ही घटना पिंपरी येथे गुरुवारी (दि. 17) दुपारी घडली.

सागर मारूती सूर्यवंशी (वय 38, रा. पिंपरी कॅम्प) आणि इतर दोघेजण (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. महेश रोहिदास रोकडे (वय 31, रा. काळेवाडी, पुणे) यांनी गुरुवारी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील आयप्पा मंदिर येथे फिर्यादी आणि आरोपी भेटले. त्यावेळी आरोपी सूर्यवंशी यांना फिर्यादी रोकडे यांनी कर्जाच्या कामाबाबत बॅंकेत चला असे सांगितले. या कारणावरून संतापलेल्या सूर्यवंशी याने रोकडे यांनी कॉलर पकडली.’तू लई शहाणा झालास का मला कर्जाबाबत विचारयला. मी बॅंकेचे कर्ज फेडणार नाही. तुला काय करायचे ते कर. तुला आणि तुझ्या चेअरमनला बघून घेतो’, अशी धमकी दिली.

इतर दोघांनी आरोपीची साथ दिली. त्यानंतर मोटारीतून जाताना आरोपी सूर्यवंशी याने रोकडे यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याची एक लाख 33 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन हिसका मारून चोरून नेली. पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा निकम याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.