Pimpri : कराराप्रमाणे गाळे न देता फसवणूक केल्याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – करार झाल्याप्रमाणे गाळे न देता त्यांची परस्पर विक्री केली. ही घटना 23 नोव्हेंबर 2011 ते 11 नोव्हेंबर 2019 या कालावधीत पिंपरी येथे घडली. याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल आहे.

विनीता ऊर्फ कविता नरेश लिलानी, (वय 46) भारती सी. रायचंदानी (वय 38), बरखा हरेश देवनानी ऊर्फ कनिष्का अभिषेख नागरानी (वय 35), अंजु ऊर्फ अंजना पवन देवनानी (वय 46), पवन लखीमल देवनानी (वय 51), साहिल पवन देवनानी (वय 20), अमन पवन देवनानी (वय 22, सर्व रा. पीडब्ल्यूडी 9/10 पिपंरी कॉलनी, पिंपरी पुणे), प्रिति ऊर्फ रेवा हरेश देवनानी (वय 65, रा. गणेश पार्क पिंपळे सौदागर पुणे), विजय जगदिशप्रसाद अग्रवाल (वय 61), मोती उदाराम पंजाबी (वय 61, दोघेही रा. थेरगाव पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. गोपीचंद जोधाराम देवनानी (वय 72, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे नातेवाईक यांनी सर्वे नं 211 व सीटीएस नं. 2521/1 ते 2521/22 पिंपरी वाघिरे येथील जागा नूतनीकरण करण्यासाठी अग्रवाल पंजाबी असोशिएटस या कंपनीच्या वतीने विजय अग्रवाल, मोती पंजाबी यांना दिली होती. त्यावेळी बिल्डर यांना फिर्यादीच्या जागेची गरज असल्यामुळे 2011 मध्ये विकास करण्यासाठी मागितली. त्याबदल्यात डिलक्‍स फॉरच्युन मॉल बांधून झाल्यावर फिर्यादी यांना पहिल्या मजल्यावर शॉप न 107, दुसऱ्या मजल्यावर शॉप नं 209, तिसऱ्या मजल्यावर शॉप नं 309 अशी तीन दुकाने कोणताही मोबदला न घेता देतो, असे लिहून दिले होते. तसेच फिर्यादी यांना नुकसान भरपाई म्हणुन दर महिन्याला 65 हजार रुपये देतो, असे सांगितले होते.

त्याबाबत 23 नोव्हेंबर 2011 रोजी लखीमल हरदासमल देवनानी, पवन लखीमल देवनानी, प्रिति ऊर्फ रेखा हरेश देवनानी, अग्रवाल पंजाबी असोशिएट्‌स या कंपनीच्यावतीने विजय अग्रवाल, मोती पंजाबी यांचे बरोबर फिर्यादी यांचा समजोता केला. यामुळे फिर्यादी यांनी जागा बिल्डरच्या ताब्यात दिली. फिर्यादी यांचे नातेवाईक व बिल्डरने डिड ऑफ कन्फरमेशन असा दस्त हवेली क्रमांक 25 येथे दस्त क्रमांक 7033/2015 हा केला. त्यांनतर सदर दुकानांचा ताबा फिर्यादी यांना न देता बिल्डरने व त्यांच्या नातेवाईकांनी परस्पर दुसऱ्याच्या नावे केला आहे. यामुळे आरोपींनी आपली फसवणूक केल्याचे फिर्याद गोपीचंद यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1