Pimpri Crime News : मुलगी पळवून लावण्यास मदत केल्याच्या संशयावरून तोडफोड

एमपीसी न्यूज – मुलगी पळवून लावण्यासाठी मदत केल्याच्या संशयावरून मुलीच्या नातेवाईकांनी एका व्यक्तीच्या घरात तोडफोड केली. ही घटना बुधवारी (दि. 14) दुपारी पिंपरी येथे घडली.

अविनाश काशिनाथ काळे (वय 27, रा. सॅनिटरी चाळ, पिंपरी) यांनी रविवारी (दि. 18) याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विकी सतीश ठोकळ (वय 30), शंकर काशिनाथ काळे (वय 34) आणि अशोक जनार्दन साठे (वय 35, तिघेही रा. सॅनिटरी चाळ, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींची एक नातेवाइक मुलगी फिर्यादी अविनाश यांच्या मेहूण्यासोबत पळून गेली. तिला पळून जाण्यात फिर्यादी यांची फूस असल्याचा गैरसमज आरोपींचा झाला.

या कारणावरून संतापलेले आरोपी 14 एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास फिर्यादी अविनाश यांच्या घरी आले. ‘तूच आमच्या नातेवाइक मुलीला फूस लावून पळवून लावले आहे’, असा आरोप करीत त्यांना शिवीगाळ केली.

त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्या घरातील दोन टिव्ही फोडून नुकसान केले. यावेळी फिर्यादी यांना मार लागल्याने ते घाबरले. त्यानंतर रविवारी (दि. 18) याच कारणावरून फिर्यादी यांच्या आई संगिता काळे यांना शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.