Pimpri Crime News : तीन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार, 19 जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – तीन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन महिन्यांपूर्वी पिंपरीतील विसर्जन घाटाकडे जाणा-या रिव्हररोडवर हा प्रकार घडला.

याप्रकरणी 48 वर्षीय महिलेनं काल शुक्रवारी (दि.30) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार 19 जणांवर बाल लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन सौदाई, सनी सौदाई, अजय टाक, जतीन मेवाती, अनिल पिवाल, जतीन टाक, तौसिफ सैयद, कृष्णा बाक्सर पारधे, वरुण टाक, कपिल टाक, आशिष ननावरे, जय पिवाल, विनय वेद, सद्दाम शेख, खलील शेख, टाक, विजय अरुण टाक, चव्हाण, खुबचंद मंगतानी ऊर्फ बुगी व सोनु मंगतानी (सर्व रा. पिंपरी, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या 16 वर्षीय मुलाला व अन्य दोन अल्पवयीन मुलांना भाजी मंडईत चोरी केल्याच्या संशयावरून जबरदस्तीने सायकलवर बसवून रिव्हररोडवर नेले. त्याठिकाणी मुलांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली व शिवीगाळ केली. तसेच त्यांचे गुप्तांग ओढले व गुदद्वाराला झेंडूबाम लावण्यास सांगितले. आरोपींनी मुलांना या भागात पुन्हा दिसायचं नाही व कुठे तक्रार द्यायची नाही, अशी धमकी दिली.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सावर्डे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.