Pimpri crime News : कल्याण मटका जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा

एमपीसी न्यूज – पिंपरी मधील बौध्दनगर येथे अवैधरित्या सुरु असलेल्या कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. त्यात पोलिसांनी 16 हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून, दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चालक नरेंद्र खटवाणी (रा. विजय डॉक्टर गल्ली, पिंपरी) आणि मालक दिनेश मेवाणी (पुर्ण नाव माहित नाही, रा.पिंपरी) यांच्या विरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बौद्ध नगर,पिंपरी येथील कै सुनील कांबळे चौक, रिव्हर रोड येथे अवैधरित्या कल्याण मटका नावाचा जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून दोघांवर कारवाई केली.

यात पोलिसांनी 11 हजार 350 रुपये रोख रक्कम, मोबाईल फोन, जुगार अड्ड्यातील साहित्य असा एकूण 16 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, सहाय्यक निरीक्षक अशोक डोंगरे, सहाय्यक फौजदार विजय कांबळे, पोलीस कर्मचारी सुनील शिरसाठ, भगवंता मुठे, नितीन लोंढे, अनिल महाजन, वैष्णवी गावडे, अमोल शिंदे, राजेश कोकाटे, गणेश करोटे, मारुती करचुंडे, योगेश तिडके यांनी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.